नागपूर : अजनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगी दिव्या (बदललेले नाव) सातव्या वर्गात शिकते. तर आरोपी श्रावण हा मूळचा गोंदियाचा असून कामाच्या शोधात नागपुरात आला होता.
दीड वर्षापासून तो अजनीतील एका डेकोरेशन कंपनीत कामाला लागला. त्याच्या वस्तीत राहणारी दिव्या ही शाळेत जात असताना तो तिचा पाठलाग करीत होता. शाळेपर्यंत तो जात होता. तिच्या घरासमोर तासनतास बसत होता. तिच्या घरी कुणी नसताना तो तिला भेटायला घरी गेला. तू मला खूप आवडतेस… मी तुझ्या प्रेमात पडलो… तू जर साथ देशील तर आपण दोघे प्रेमविवाह करु…असे बोलून जाळ्यात ओढले. लग्न करणार असल्यामुळे दिव्यासुद्धा फसली.
दोघांच्याही भेटी-गाठी वाढल्या. घरी कुणी नसताना दोघेही एकमेकांना भेटायला लागले. महिन्याचे वेतन मिळाले की श्रावण तिला चित्रपट, हॉटेल आणि फिरायला घेऊन जायला लागला. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.
आई-वडिल गाढ झोपल्यानंतर मुलगी मध्यरात्री एक वाजता प्रियकराच्या दुचाकीवरुन घरातून बाहेर पडली. ती सकाळी पाच वाजता घरी परतली आणि तेवढ्यात वडिलांना जाग आली. मुलीला युवकाच्या मिठीत बघताच वडिल संतप्त झाले. वडिलांनी दम देताच तिने प्रियकराने बळजबरी शारीरिक संबंध केल्याची कबुली दिली. या प्रकरणी तक्रारीवरुन अजनी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. श्रावण राऊत (३०, अजनी) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
मध्यरात्री भेटण्याचा मोह आला अंगलट
श्रावण आणि दिव्याचे शनिवारी मध्यरात्रीला भेटण्याचे ठरले होते. एक वाजता कुटुंब झोपल्यानंतर हळूच चौकात आली. तेथे श्रावण दुचाकी घेऊन उभा होता. त्याने तिला फुटाळ्यावर फिरायला जाण्यासाठी विचारले. तिने नकार दिल्यामुळे डेकोरेशनच्या गोदामात नेले. तेथे दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पहाटे पाच वाजेपर्यंत थांबल्यानंतर दिव्याने घरी सोडून मागितले.
प्रियकर पळून गेला
श्रावणने पहाटे पाच वाजता दिव्याला घरासमोर सोडले. तिने जाताना प्रियकराला मिठी मारली आणि तेवढ्यात तिचे वडिल लघुशंकेसाठी घराबाहेर आले. मुलीला प्रियकराच्या मिठीत बघताच त्यांचा पारा चढला. दरम्यान, प्रियकर पळून गेला. मुलीला विचारणा केली असता तिने प्रियकर असल्याची कबुली दिली. तसेच प्रियकराने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही वडिलांना सांगितले. या प्रकरण अजनी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन प्रियकराला अटक केली.
कुही:=
बस स्थानकावर बसची वाट पाहत बसलेल्या गावाला सोडून देण्याचे आमिष दाखवून युवकाने महिलेच्या गड्यातील दोन मंगळसूत्र लंपास केल्याची घटना कुही पोलिस ठाण्याचा हद्दित घडली असून महिलेच्या तक्रारीवरून कुही पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांची विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फर्यादी पुष्पा पांडुरंग चौधरी वय 65 वर्षे रा. मोहखेडी ता. मौदा या शनिवारी मुलीला भेटण्यासाठी मुलीचा सासरी उमरेड येथे जाण्यासाठी मौदा बस स्थानकावर बसची वाट पाहत बसल्या होत्या.
माञ बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने दुसर्या बसची वाट पाहत असतांना एक अनोळखी तरुण दुचाकी घेऊन त्यांच्या जवळ आले. आणि तुम्ही कोठे जात आहे असे विचारताच महिलाने उमरेडला जात आहे असे सांगितले. तेव्हा यवकाने रा. मौजा मांढळ येथील रहिवासी असल्याचे सांगितले, आणि कामासाठी उमरेडला जात असल्याचे सांगून तुम्हाला सुध्दा उमरेड सोडतो असे म्हणून महिलाने सुध्दा युवकावर विश्वास ठेवून गाडी वर बसल्या.
तरूणाने सुरुवातीला चहा पिण्याचा बहाण्याने चापेगडी येथे थांबले, आणि कुही मार्ग मुसळगाव कडे नेत असताना हा रस्ता उमरेडला जात नाही असे फिर्यादी महिलाने म्हटल्यावर हा एक रस्ता तारणा मार्गे उमरेडला जातो.
असे सांगून पेट्रोलची विचारणी करण्यासाठी गाडी थांबवली माञ स्थानकाने येथे प्रेटोल मिळत नाही, कुहीला परत जावे लागणार असे स्थानिकाने सांगितले.
तरुणाने गाडी परत घुमवरी माञ कुही कडे न जाता सोनपुरी माल्गे नेऊ लागला. तितक्यात महिलेच्या फोन वाजू लागली .
महिला गाडीचा खाली उतरवून फोनवर बोलत असतांना महिलेचा माणेवर अळी असल्याचे सांगून गड्यातील दोन मंगळसूत्र 29000 किमतीचे हिसकावून पळून गेला.
महिलेने कुही पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार केली.
उमरेड/29:- बहुजन समाज पार्टी उमरेड विधानसभेत पक्ष संघटन वाढविन्याबाबत व पुढे होणारी विधानसभा निवडणूक संर्दभात विचारविनीमय करणेसाठी *29–07–2024 (सोमवार) ला 11.०० वाजता साने गुरुजी जेष्ट नागरीक सभागृह उमरेड* येथे मा योगेशभाऊ लांजेवार अध्यक्ष नागपुर जिल्हा बसपा,मा ई.गोपाळजी खांबाळकर माजी कोषाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश बसपा, मा .ए आर मेश्राम सर, मा .डी ठी रामटेके साहेब,,विधानसभा कमेटी,उमरेड ,भिवापूर कुही ,तालूका कमेटी ,तीनही शहर कमेटी, सेक्टर प्रभारी, बुथ अध्यक्ष आजी माजी पदाधिकारी,कार्यकर्ता हीतचिंतक यांचे उपस्थित महापुरूषाचें प्रतिमेला माल्यार्पन करुण व अभिवादन करुन
26जुलै आरक्षण दिवस साजरा करन्यात आला मा जिल्हा अध्यक्ष यांनी सर्व पदाधिकारी कडून पक्षाचे उमरेड विधानसभेतील कामाविषयी माहीती जानूण घेतली, मा पूनेश्वर मोटघरे अध्यक्ष उमरेड विधानसभा यांनी विस्तृत माहीती सांगीतली सेक्टर वाईज बाईक रॉली काढून जनजागृती करन्याची सूचना देन्यात आली विधानसभा निवडनूक लढन्यासाठी ईछ्यूक कार्यकर्ता कडून दी 5/8/24पर्यंत पक्षाकडे उमेदवारी मागणी करन्यासंबधी सूचना देन्यात आल्या ,पक्ष सदश्य नोंदनी करने बाबत सागंन्यात आले मा ई खांबाळकर साहेब यांनी कार्यकर्तांना प्रशिक्षण दिले,यावेळी पुढील प्रमाने पदाधिकारी नियुक्त ,मा.बोधिस्तवशेंडे अध्यक्ष उमरेड तालुका,मा.अमोल गोळघाटे बेला झोन अध्यक्ष, सुबोध गजभिये प्रभारी राजोला सेक्टर,उत्तम ढोणे मकरधोकडा सेक्टर प्रभारी,सौ मिनाताई शेंडे उपाध्यक्ष महीला आघाडी उमरेड विधानसभा,सविता मुळे अध्यक्ष महीला आघाडी उमरेड शहर,पुंडलीक पडोळे अध्यक्ष वेलतूर सेक्टर,मनोज खराबे प्रभारी सिल्ली सेक्टर,सौ सुरेखा वासनीक अध्यक्ष भिवापुर ता महीला आघाडी, मा धम्मा मेश्राम सहसचीव उमरेड विधानसभा,ईश्वर रामटेके भागेबोरी सेक्टर प्रभारी ,शिवाभाऊ कांबळे शेडेश्वर सेक्टर प्रभारी,परमानंद बोरकर तीतुर सेक्टर प्रभारी,बाबुलाल गजभिये महालगावं सेक्टरप्रभारी,सेवक फुलझेले उदासा सेक्टर प्रभारी,यांची वरील पदावर नियुक्ती करन्यात आली,मा शशिकांत मेश्राम प्रभारी उमरेड विधानसभा यांनी माहीती दीली, ईजिं भिमराव गजभीये यांनी बामसेफ बाबत माहीती दिली, शूभंम खोब्रागडे अध्यक्ष कुही ता,व श्रिकृष्ण खोब्रागडे अध्यक्ष भिवापुर ता,यांनी पक्ष संघटन काम करीत असतांना होत असलेल्या अडचणी सांगितल्या, प्रियाताई गोंठाने मा कोषाध्यक्ष ना.जि.,राजकुमार लोखंडे माजी सभापती उमरेड,
,राजु शुर्यवंशी कोष्धयक्ष उमरेड वि,दीलीप काबंळे प्रभारी उमरेड वि, अभय गायकवाड महासचिव उमरेड वि,उमाकांत रामटेके,जगदीस सोनट्टके, सचिन मानवटकर, मान्यवर उपस्तित होते .मा प्रदीप चव्हाण उपाध्यक्ष उमरेड विधानसभा यांनी रर्वांचे आभार मानले यावेळी उमरेड,भिवापूर ,कुही,बेला या चारही झोन मधून युवक,महीला,मोट्या सखेंने उपस्थिती होती सर्व बसपा कार्यकर्ते, बामसेफ व हितचिंतक उपस्थित होते
नागपूर सावनेर :
सावनेर पोलीस यांच्या माहितीनुसार
विषप्राशन करून मृतक:राजुभाउ गजभिये यांनी जीवनयात्रा
संपविली, मूकबधिर शाळेजवळ वॉर्ड no ३ येथील रहिवाशी
पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील घटना
रात्री ११.३० चे दरम्यान
त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉ. यांनी मृत
घोषित केले.
टीप......
.रात्रीच वेळी मृतदेह मारचूरी मध्ये घेउन जातांना वाढलेले गवत
धोकादायक बसून येथे रात्री बे रात्री पोलिसांना ambulece
वाले, नातेवाईक, यांचा जीवाला धोका नाकारता येतं नाहीं
अशीच एक घटना काल रात्रीच वेळी राजू गजभिये याचा मृतदेह
शवाविच्छेदन ब करण्याकरता मृतदेह रात्री ठेवत
असताना,गाडीतून उतरताना गवतावर पाय ठेवला असता,
सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच पायावरून धामण
जातीचा बिनविषारी साप गेला, त्याचं ठिकाणी विषारी साप
असता तर जीवावर बेतली असती, नगरपरिषद प्रशासनाने तिथे
वाढलेला गवत पूर्णपणे साफसफाई करण्यात यावी पुढील
तपास सावनेर पोलीस यंत्रणा करीत आहे
बिल गेट्स या नावाला वेगळ्या ओळखीची काहीच गरज नाही. आपल्या सामाजिक कार्यांसाठीदेखील ते जगभर फिरत असतात आणि सगळ्या सुखसुविधा त्यांच्या पायाशी लोळण घेत असतात. असे असतानादेखील अब्जाधीश बिल गेट्स यांना चक्क नागपुरातील चहाविक्रेत्याच्या चहाने भुरळ घातली.
त्यांनी चक्क त्या चहाविक्रेत्याला आमंत्रित करून डोळ्यासमोर चहा बनवताना पाहिले आणि त्याच्यासोबत 'चाय पे चर्चा' करत त्याच्या कौशल्याबाबत कौतुकोद्गारदेखील काढले. खुद्द गेट्स यांनी 'इन्स्टाग्राम'वर शेअर केलेला हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून अशा अनेक 'मिनी चाय पे चर्चा' भविष्यात दिसतील असे संकेतच यातून त्यांनी दिले आहे.
नागपुरातील सदर परिसरातील 'डॉली चहावाला' हा मागील अनेक काळापासून 'सोशल मीडिया'वर प्रसिद्ध आहे. त्याचे मोठे फॅन फॉलोईंग असून चहा बनविण्याच्या त्याच्या हटके स्टाईलमुळे त्याचे व्हिडीओ व रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. गेट्स यांना सोशल माध्यमांतूनच त्याच्याबाबत कळाले व त्यांनी एका हिल स्टेशनवर त्याला आमंत्रित केले.
नागपूर : एका हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने पॅरोलवर बाहेर येताच विवाहित प्रेयसी महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर प्रेयसीच्या १५ वर्षीय मुलीवरही त्याची नजर फिरली. प्रेयसीला घराबाहेर काढून तिच्या मुलीवर बलात्कार केला. प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. कुणाल भारत गोस्वामी (३३) रा. जरीपटका, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
कुणाल गोस्वामी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. २०१४ मध्ये कुणाल आणि त्याच्या साथीदारांनी पप्पू काळे नावाच्या गुडांचा भरचौकात चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणात न्यायालयाने कुणाल आणि त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पीडित महिला आणि कुणाल शेजारी होते. त्यामुळे त्यांच्यात ओळख होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पती घरी नसताना कुणाल महिलेशी शारीरिक संबंध ठेवत होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कुणाल पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला. तो प्रेयसीला भेटाण्यास तिच्या घरी गेला.
यावेळी जबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिलेच्या गैरहजेरीतही तो तिच्या घरी जात होता. या दरम्यान त्याची प्रेयसीच्या १५ वर्षीय मुलीवर वाईट नजर पडली. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्या आईशी असलेले प्रेमसंबंध वडिलाला सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईलाजास्तव मुलीने होकार दिल्याने त्याने लैंगिक अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. कुणालच्या गुंड प्रवृत्तीमुळे पीडित मुलगी गप्पच राहिली. जानेवारी २०२४ ला तो पुन्हा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. त्यानंतर त्याने मुलीलाही संबंधाची मागणी केली. विरोध केला असता तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि धमकावून निघून गेला. मुलीने आईला घटनेची माहिती दिली. कुणालने यापूर्वीही जबरीने अत्याचार केल्याचे सांगितले. महिलेने प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी आरोपी कुणालवर लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. कुणाल विरुद्ध घरफोडी, लोकांना धमकावणे, खून व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याने कोणीही त्याच्या विरुद्ध तक्रार करीत नव्हते. यामुळे त्याची हिंमत वाढली होती. पॅरोलवर सुटल्यानंतर तो सतत महिलेचे लैंगिक शोषण करीत होता. मात्र मुलीचेही लैंगिक शोषण करीत असल्याचे समजल्याने महिलेने हिंमत करून पोलिसात तक्रार केली.
नागपूर : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यावर नागपूरमधील एका मुलाने त्याच्या मैत्रीणीवर वारंवार बलात्कार केला. नागपूरच्या सत्र न्यायालयाने फेसबुक फ्रेंडला कठोर शिक्षा सुनावण्यात दहा वर्षाचा सश्रम कारावास भोगण्याची शिक्षा दिली. आरोपी मुलावर तीन हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम जमा न केल्यास आरोपीला सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. सत्र न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला.
आकाश गजानन टाले (२७) असे आरोपीचे नाव असून, तो मानवसेवानगर येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १७ वर्षे ७ महिने वयाची होती. ती ब्यूटी पार्लरचे काम करीत होती. २०१८ मध्ये तिची आरोपीसोबत फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. २३ सप्टेंबर २०१८ रोजी ते फुटाळा तलावाजवळ एकमेकांना भेटले. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीवर प्रेम व्यक्त करून तिला लग्न करण्याचे वचन दिले.
काही दिवसांनी आरोपीने पीडित मुलीला मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला. पुढे आरोपीने २०१९ पर्यंत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने मुलीसोबतचे संबंध तोडले. तिच्यासोबत बोलणे बंद केले. परिणामी, मुलीने १८ मे २०१९ रोजी आरोपीविरुद्ध मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.
नागपूर : एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडणारे प्रियकर-प्रेयसी कुटुंबीयांच्या विरोधासह अन्य अडचणींचा सामना करीत प्रेमविवाह करतात. सात जन्म एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतात. मात्र, दोघांचे पती-पत्नीत रुपांतर झाल्यानंतर संसारात शेकडो अडचणी आल्याने थेट घटस्फोटाकडे कल वाढत चालला आहे. गेल्या पाच वर्षात तब्बल ३ हजार ६० प्रेमविवाह करणाऱ्यांनी भरोसा सेलमध्ये मदतीसाठी धाव घेतली आहे.
फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरून एकमेकांच्या प्रेमात पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच वर्गमित्र किंवा मैत्रीतून युवक-युवती एकमेकांच्या प्रेमात पडल्याचेही प्रमाण वाढत आहे. दोघेही सुरुवातीला प्रेमात बुडाल्यानंतर एकमेकांवर जीव ओवाळून टाकण्याची भाषा करतात. काही दिवसांच्याच प्रेमसंबंधात दोघांचाही एकमेकांवर विश्वास बसून थेट प्रेम विवाहापर्यंत मजल जाते. प्रेमविवाहास युवकाच्या कुटुंबियांमध्ये फारसा विरोध दिसत नाही. परंतु, युवतीच्या कुटुंबियांतून प्रेमविवाहास नेहमी विरोध असतो. समाजात असलेली प्रतिष्ठा आणि नातेवाईकांमध्ये होणारी बदनामी याची भीती असते. परंतु, प्रेमविवाहास सर्वाधिक उत्सूकता तरुणीकडूनच दाखवल्या जाते.
अनेक प्रकरणांमध्ये प्रियकर प्रेमविवाहास टाळाटाळ करतो तर युवती थेट घरातून पळून जाऊन लग्न करण्याची तयारी दर्शवते. भविष्यात सुखी संसाराची स्वप्ने रंगविल्या जातात. प्रत्येक अडचणींवर मात करून संसार यशस्वी करण्याचा दोघांचाही मानस असतो. त्यामुळे भविष्याचा कोणताही विचार न करता कुटुंबियांचा विरोध पत्करून अनेक प्रेमविवाह पार पडतात. दोघांचा वेगळा संसार सुरु होता. दोघांवरही पती-पत्नी म्हणून जबाबदारी येते. दोघांच्याही भूमिका बदलतात आणि संसारात खटके उडायला सुरुवात होते. ‘तुझे पूर्वीसारखे प्रेम राहिले नाही किंवा तू मला वेळ देत नाही,’ अशी तक्रार पत्नीची असते तर काम शोधण्यापासून तर घराचे भाडे देण्यापर्यंतचा विचार पती करीत असतो. याच कारणामुळे घरात पती-पत्नीत वाद वाढायला लागतात. त्यामुळे संसार तुटण्याच्या काठावर येतो. नागपुरात असे शेकडो प्रेमविवाह सध्या मोडकळीस आलेले दिसतात. गेल्या पाच वर्षांत ३ हजार ६० जणांनी प्रेमविवाह केल्यानंतर वाद झाल्यानंतर भरोसा सेलकडे धाव घेतली आहे.
तरुणींना सर्वाधिक अडचणी
कुटुंबियांचा विरोध पत्करून प्रियकरासोबत पलायन करून लग्न केल्यानंतर तरुणीचे माहेर तुटते. माहेरकडील कुणीही तिला साथ देत नाही किंवा थेट संबंध तोडतात. प्रेमविवाहानंतर दोघांतील वाद मिटवायला कुणी नातेवाईकही तयार नसतात. एकाकी पडलेल्या तरुणीची बाजू ऐकुनही घ्यायला कुणी तयार नसते. कठिण परिस्थितीत तरुणींना जीवन कंठावे लागते.
“प्रेमविवाह केल्यानंतर नव्या संसारात खटके उडण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रेमविवाहानंतर अगदी काही महिन्यांतच दोघांत वाद झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. मात्र, भरोसा सेलमध्ये तक्रार आल्यानंतर दोघांनाही बोलवून संसार आणि वैवाहिक आयुष्याबाबत समूपदेशन केल्या जाते. अनेकांचे संसार नव्याने थाटण्यात भरोसा सेलला यश आले आहे.” – सीमा सूर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरोसा सेल.
नागपूर:-
ज्वेलर्सच्या दुकानात काम करीत तिथे टप्प्याटप्प्यांने सोने आणि चांदीची चोरी करणारी महिला आणि मुलींच्या "गुलाबी गँग'चा तहसील पोलिसांनी पर्दाफाश केला.
त्यांच्याकडून १ हजार ४५० ग्रॅम सोने आणि साडेदहा किलो चांदी असा ९४ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा महिलांवर गुन्हा दाखल केला असून चार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अस्मिता उर्फ स्वाती प्रकाश लुटे (वय ३९, रा. वर्धमाननगर, देशपांडे ले आउट), प्रिया प्रणव राऊत (वय ३०, ४ पवनगाव रोड, कळमना), पूजा राजाराम भनारकर (वय २०, रा. नंदगिरी रोड, पाचपावली), कल्याणी मनोज खडतकर (वय ३३, रा. श्रीकृष्णनगर) अशी अटकेतील महिला व युवतींची नावे आहेत. भाग्यश्री पवन इंधनकर (वय ३०, रा. तिननल चौक, तहसील), मनीषा ओमप्रकाश मोहुर्ले (वय ३८, रा. प्रेमनगर, झेंडा चौक, शांतीनगर)यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता ऊर्फ स्वाती ही गेल्या काही वर्षांपासून तहसील येथील चिमुरकर ज्वेलर्समध्ये काम करीत होती. ती पूर्वी सोन्याचांदीच्या दागिण्यांची विक्री ते बिलिंग करण्यापर्यंतची सर्व कामे करायची, त्यानंतर मनीषा तिथे कामाला लागली. तीही जवळपास हीच कामे करायची.
त्यानंतर प्रिया, कल्याणी, पूनम आणि भाग्यश्री याही येथे सेल्सगर्ल म्हणून रुजू झाल्या. या सर्वांवर मालकांचा विश्वास बसल्यानंतर त्या दुकानातील सोने आणि चांदीच्या वस्तू थोड्या-थोड्या प्रमाणात काढून घ्यायला लागल्या.
विशेष म्हणजे, याबाबत मालक शंतनू चिमूरकर (वय २८ रा. रेशीमबाग) यांनी कधीही किती विक्री झाली आणि किती माल शिल्लक आहे, याची कधीही विचारणा केली नाही. त्यामुळे याचा फायदा घेत, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांची ही चोरी सुरूच होती. त्यानुसार पोलिसांनी एकूण १ हजार ४५० ग्रॅम सोने आणि साडेदहा किलो चांदी जप्त केली. चारही महिला आरोपींना अटक करीत, पोलिसानी कोठडी मिळविली. आता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
असे फुटले बिंग
जुलै महिन्यात चिमूरकर ज्वेलर्स येथून सोन्याची अंगठी चोरीला गेली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी जयेश सोनकुसरे याला अटक केली. त्याने या प्रकरणात माहिती देताना, येथे काम करणाऱ्या महिला यापेक्षा जास्त चोरी करीत असल्याची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली असता हा सगळा प्रकार समोर आला. त्यानुसार पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सोने जप्त केले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. परंतु, विविध पक्ष एकत्र आल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. कोण कुठून जागा लढवणार यावरून छुपे वाद सुरू आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टोला लगावला आहे. जागा वाटपाचा विषय गांभीर्याने घेण्यापेक्षा मोदींविरोधात लढा उभा करायला हवा, असं प्रकाश आबंडेकरांनी सुचवलं आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे मनुस्मृती दिनानिमित्त सोमवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
“कोणी म्हणतंय मी २३ जागा लढेन, कोणी म्हणतंय अमुक जागा लढवेन. आम्ही त्यांना म्हणतोय पहिल्यांदा जागा सोडा. पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे?” असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला विचारला आहे.
“मोदी घालवायचा असेल तर २-४ जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असली पाहिजे. नाहीतर आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, या भूमिकेवर राहिलात तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही. अन् तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला.
नागपुर: लगातार तीसरे दिन, देश का घरेलू हवाई यातायात सोमवार को एक नए शिखर पर पहुंच गया, जब एयरलाइंस ने 4,59,526 यात्रियों को ढोया। सोमवार (20 नवंबर) को ट्रैफिक संख्या के एक दिन के नए रिकॉर्ड को छूने के साथ, नागरिक उड्डयन मंत्रालय ने कहा कि कोविड के बाद, भारत की घरेलू विमानन बदलाव की कहानी न केवल जबरदस्त रही है, बल्कि प्रेरणादायक भी है। मंत्रालय ने एक्स पर एक पोस्ट में कहा, सकारात्मक रवैया, प्रगतिशील नीतियां और यात्रियों के बीच गहरा विश्वास इसे हर उड़ान के साथ हर दिन नई ऊंचाइयों पर ले जा रहा है।
नवीनतम आधिकारिक आंकड़ों के अनुसार, 20 नवंबर (सोमवार) को 4,59,526 यात्री थे और कुल उड़ान आवाजाही 5,958 थी। 20 नवंबर, 2022 को घरेलू हवाई यात्रियों की संख्या 3,94,07 थी और उड़ान आंदोलनों की संख्या 5,468 थी। मंत्रालय ने आंकड़ों का एक ग्राफिक साझा करते हुए कहा, "भारत का घरेलू विमानन नित नए आसमान छू रहा है।" नागरिक उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ने मंगलवार को कहा, "एक और दिन, एक और रिकॉर्ड!"